भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें माझें मना येतें पंढरीनाथा । न सोडी सर्बथा चरण तुझे

aisen majhen mana yeten pandharinatha | na sodi sarbatha charan tujhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें माझें मना येतें पंढरीनाथा । न सोडी सर्बथा चरण तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी गोपाळा । कां स्नेह लावियेला पूर्वींहुनी ॥२॥ ह्रदयीं चित्तवृत्ति मनेंसि मिळोनी । अवघीं तुझ्या चरणीं सुरवाडिलीं ॥३॥ नामा म्हणे केशवा धरिली तूझी सेवा । सुखा अनुभवा अनुभविलें ॥४॥