भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें बोलोनियां ते उन्मत । ठोक फोडिले सक्रोधयुक्त । आले सन्मुखचि धांवत । कृष्णबळिरामेंसी झगटावया

aisen boloniyan te unmat | thok phodile sakrodhayukta | ale sanmukhachi dhanvat | krushnabaliramensi jhagatavaya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसें बोलोनियां ते उन्मत । ठोक फोडिले सक्रोधयुक्त । आले सन्मुखचि धांवत । कृष्णबळिरामेंसी झगटावया ॥१॥ त्यां देखोनियां बळिराम । आणि हासोनी बोलती मेघ:श्याम । तुम्ही करुं आलेती संग्राम । तरी निरऊनियां स्त्रियां बाळां ॥२॥ आजिवरी भोगिलिया संपत्ती । त्याच्या संगे सुख विश्रांती । त्यांसी न पुसतां जाणें अंतीं । महापंथी हें उचित नव्हे ॥३॥ कंसारायाचें वैभव । भोगिलें चिरकाळवरी सर्व । त्याचिये काजीं वेचितां जीव । पावाल स्वयमेव उत्तम गती ॥४॥ परी एक सांगतों विचार । संग्रामीं न सांडावा धीर । जें जें वसउनियां शरीर । असेल विदया ते ते दावा ॥५॥ बहुत वल्गना आतां । वस्तादातें न पुसतां । यावरी तरी निश्रचळ चित्ता । करुनियां आठवा तयातें ॥६॥ निळा म्हणे बोलोनी ऐसें । युध्दीं उठावले सरिसे । मातंगा देखोनियां जैसे । सिंह पाडे भुकाळू ॥७॥