भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा वर देई हरी । गाईं नाम निरंतरीं

aisa var dei hari | gain nam nirantarin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसा वर देई हरी । गाईं नाम निरंतरीं ॥१॥ पुरवीं आस माझी देवा । जेणें घडे तुझी सेवा ॥२॥ हेंचि आहे माझे मनीं । कृपा करीं चक्रपाणी ॥३॥ रूप न्याहालूनियां डोळां । मुखीं नाम लागो चाळा ॥४॥ उदाराच्या राया । दासी जनी लागे पायां ॥५॥