भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा वर देई हरी गाई नाम निरंतरी

aisa var dei hari gai nam nirantari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऐसा वर देई हरी गाई नाम निरंतरी।।१॥ पुरवी आस माझी देवा जेणें पडे तुझी सेवा ॥२॥ चि आहे माझे मनीं । कृपा करी चक्रपाणी।।३।। रूप न्याहाळूनियां डोळां । मुखीं नाम लागो चाळा ॥४॥ उदाराच्या राया। दासी जनी लागे पायां।॥५॥