भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा संत विरळा भेटे भाग्ययोगें । आथिला वैराग्यें सप्रेमळ

aisa sant virala bhete bhagyayogen | athila vairagyen sapremal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसा संत विरळा भेटे भाग्ययोगें । आथिला वैराग्यें सप्रेमळ ॥१॥ सर्वभावें करूनि सर्वभूतीं करुणा । जेथें मीतूंपणा ठाव नाहीं ॥२॥ भजन तया नांव निर्विकार निकें । विश्र्वीं माझ्या देखे विठोबासी ॥३॥ अखंड ह्लदयीं तेचि आठवण । साजिरे सम-चरण विटेवरी ॥४॥ नादलुब्ध जैसा आसक्त हरिण । जाय विसरोन देहभाव ॥५॥ यापरी तल्लीन दृढ राखें मन । तयापरी श्रवण आव-डीचें ॥६॥ व्यवसायीं मन ठेवूनि कृपण । लाभाचें चिंतन सर्वकाळ ॥७॥ यापरी स्वहित अखंड विचारणें । करीं तें मनन सत्त्वशील ॥८॥ परपुरुषीं आसक्त जैसी व्यभिचारिणी । न लगे तिच्या मनीं घराचार ॥९॥ कीटकी भृंगीं जेंवि ऐसें अनुसंधान । निकें निज- ध्यासन दृढ होय ॥१०॥ सर्वभावें एक विठठलचि ध्यायीं । सर्वभूर्तीं पाही रूप त्याचें ॥११॥ सर्वांहूनि निराळा रजतमाहूनि वेगळा । भोगी प्रेमकळा तोचि भक्त ॥१२॥ सत्याचा सुभट नि:संगें एकट । वैराग्य उद्भट एकनिष्ट ॥१३॥ प्रारब्धाचे भागीं नेणें देहस्फुर्ति । अखंड ते धृति निरूपम ॥१४॥ निर्वासना मन निर्लोभ संपूर्ण । नेणें स्वरूपज्ञान संकल्पाचें ॥१५॥ अनुरागीं गोविंद गाईजे एकांतीं । या-परी विश्रांति आणिक नाहीं ॥१६॥ काया वाचा मन हा माझा अनु-भव । सांगितला सर्व आवडीचा ॥१७॥ नामा ह्मणे हेंहि बोलविले जेणें । उदार सर्वज्ञ पांडुरंग ॥१८॥