भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा हा देवानें थोर पवाडा केला। पूर्व अवतारी झाला हयग्रीव

aisa ha devanen thor pavada kela| purva avatari jhala hayagriv

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऐसा हा देवानें थोर पवाडा केला। पूर्व अवतारी झाला हयग्रीव ॥ १॥ मग अंबऋषीसाठी पडियेला संकटीं । मच्छ झाला पोटीं समुद्राच्या ।। २ ।। होउनी कच्छप पर्वत धरिला । वराहे मारिला दैत्य भार ।।३॥ तयाचा सहोदर मृत्यु नाहीं ऐसा वर तेव्हां अवतार नारसिंह झाला ||४|| अर्धनारी नटेश्वर दुसरा तो वामन । भार्गव ते निधान दाशरथी ||५|| होऊनियां कृष्ण कंस वधियेला । आतां बुद्ध झाला सखा माझा ॥६॥ लीला अवतारीं हरि करी खेळ नाना म्हणे जनी जाणा तें मी होत्यें ।।७।।