भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनियां वाणी । संतोषला शूळपाणी

aikoniyan vani | santoshala shulapani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐकोनियां वाणी । संतोषला शूळपाणी ॥१॥ देवी चांगलें पुसिलें । तुझ्या बोलें चित्त धालें ॥२॥ बोल नव्हती साचार । जड जीवाचा उद्धार ॥३॥ बोल तुझे गोडावले । जगीं सुदिन पाहिजे ॥४॥ शिवरात्रीचें महिमान । नामा ह्मणे ऐका जन ॥५॥