भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐके गोणाई म्हणे केशिराज । सदा अरज तुझें नामदेवा

aike gonai mhane keshiraj | sada araj tujhen namadeva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐके गोणाई म्हणे केशिराज । सदा अरज तुझें नामदेवा ॥१॥ संसारादि यासी नावडेचि कांहीं । मिठीच वो पायीं घातलीसे ॥२॥ नेणों याच्या जीवें घेतलेसें कांहीं । लोळणींच पायीं घातलिसे ॥३॥ पुसे वो जीवीचें काय काय आवडे । उमगोनि कोडें नेई यासी ॥४॥ देतां कांहीं न मागे नसतां कांहीं नेघे । गुज पैं न सांगें अंतरीचें ॥५॥ जन्मोनि सांकडें घातलें वो कैसें । गिळिल मज ऐसें वाटतसे ॥६॥ मी भावासि भुललों सांपडलों याचे हातीं । करिल काय अंतीं न कळे कांहीं ॥७॥ एक वेळ मज सोडवीं या पासोनी । दे कां मज लागोनि जीवदान ॥८॥ माझिये पैं बोले मजचि गोविलें । यातें आपंगिलें अनाथ म्हणोनि ॥९॥ अंगोळिये धरितां खांदा वोळंगिये । आतां माझें केलें न चले कांहीं ॥१०॥ तूं आपुलिया मनीं विचारूनि पाही । नामा आपुला नेई आवडता ॥११॥ माय लेक दोघे साम्राज्य करा । घ्यावें धरणीवरी सुख याचें ॥१२॥ कठिण बोल तुझे बहूसाळ ऐकिले । नाहीं त्वां गे पाहिलें मागेंपुढें ॥१३॥ आतां तुझी कैसी झांकोळिली माया । मज करिसी वायां इष्ट तूं गे ॥१४॥ ऐसें देवाचें बोलणें ऐकोनि उदास । नाम्या जाले क्लेश तयेवेळीं ॥१५॥ नामा म्हणे देवा ऐसें कैसें घडे । सृष्टीहि पैं बुडे तरी न सोडी तुज ॥१६॥