भजनी मालिका
← भजनांकडे परत

आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला

ai meli bap mela maj sambhali viththala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला ।।१।। हरी रे मज कोणी नाहीं । माझी खात असे डोई ||२|| विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझे जनीला नाहीं कोणी ॥३॥ हातींघेउनीतेलफणीकेंसविंचरूनघालीवेणी||४|| वेणी घालुन दिधली गांठ। जनी म्हणे चोळ वा पाठ॥५॥ जनी म्हणे बा गोपाळा। करी दुबळीचा सोहळा ||६