भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगुणाचिया पा समंधा गुणसंबंध करु

agunachiya pa samandha gunasambandh karu

अगुणाचिया पा समंधा गुणसंबंध करु । नकळे हा वेव्हारु लोकांमाजी । हा नाटकु विंदाणी न कळे याची करणी । दाटोनि अंत:करणीं रिघों पाहे ॥१॥ सरसर परता गुणाचिया गुणा । निजसुखानिधानां तूंचि एकु ॥२॥ तुझ्या गुणागुणीं वेधलीं मुनिवृंदें । मानसाचिया छंदें वर्तसी तूंचि ॥ आपुलें निज सोंग भुलविलें जयासी । अखंड मानसीं जवळी आहे ॥३॥ ऐसा हा नवलावो विस्मो हा वाटला । भाव हा गळाला काय सांगों । रखुमादेविवरु विठ्ठलु ह्रदयीं वसे । बाह्यअभ्यंतरी केव्हां वेगळा नव्हे रया ॥४॥