भजनी मालिका
← भजनांकडे परत

अग्निमाजिं पडे बाळू । माता धांवे कनवाळू

agnimajin pade balu | mata dhanve kanavalu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अग्निमाजिं पडे बाळू । माता धांवे कनवाळू ॥१॥ तैसा धांवे माझिया काजा । अंकिला मी दास तुझा ॥२॥ सवेंचि झेपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ॥३॥ भुकेलें वत्स रावें । धेनु हुंबरत धांवे ॥४॥ वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतित हरिणी ॥५॥ नामा म्हणे मेघा जैसा । विनवितो चातक तैसा ॥६॥