भजनी मालिका
← भजनांकडे परत

अग्नीचे पोटीं पुरुष उध्दवला अवचट

agniche potin purush udhdavala avachat

अग्नीचे पोटीं पुरुष उध्दवला अवचट । सत्रावी लंपट निशिदिनीं ॥१॥ आधार नाहीं जेथ निराधार वर्तती । निराधार न म्हणती आपणा लागीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीने दाविलें । या नयनीं पाहिलें अविनाश ॥३॥