भजनी मालिका
← भजनांकडे परत

अग्नी जाळी तरी न जळती पांडव । ह्रदयीं माधव म्हणोनियां

agni jali tari na jalati pandav | hradayin madhav mhanoniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अग्नी जाळी तरी न जळती पांडव । ह्रदयीं माधव म्हणोनियां ॥१॥ अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ । ह्रदयीं देवकीबाळ म्हणोनियां ॥२॥ अग्नी जाळी तरी न जळे हनुमंत । ह्रदयीं सीताकांत म्हणोनियां ॥३॥ अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद । ह्रदयीं गोविंद म्हणोनियां ॥४॥ अग्नी जाळी तरी न जळे पैं सीता । ह्रदयीं रघुनाथ म्हणोनियां ॥५॥ लंकेसी उरलें बिभीषणाचें घर । ह्रदयीं सीतावर धरिला म्हणोनिया ॥६॥ नामा म्हणे तुम्ही स्मरावें गोविंदा । चूके भवबाधा संसाराची ॥७॥