भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगणित गुण वर्णिती पुराणें । पंढरीचे राणे ख्याती जयीं

aganit gun varniti puranen | pandhariche rane khyati jayin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अगणित गुण वर्णिती पुराणें । पंढरीचे राणे ख्याती जयीं ॥१॥ अलक्ष भेटी लक्षिताची नाहीं । पुंडलिकें कांहीं तप केलें ॥२॥ युगें गेलीं अठ्ठावीस ते अझुनी । उभा चक्रपाणी रा-हिलासी ॥३॥ वेद ह्मणती नेति पुराणें तें किती । भांबावल्या मती ह्मणे नामा ॥४॥