भजनी मालिका
← भजनांकडे परत

आगम निगमा बोलतां वैखरी

agam nigama bolatan vaikhari

आगम निगमा बोलतां वैखरी । तो यशोदेच्या करीं धरूनी चाले ॥ १ ॥ न संपडे शिवा बैंसताची ध्यानीं । जालिया उन्मनी दृश्य नव्हे ॥ २ ॥ कमळासनीं ब्रह्मा ध्यानस्थ बैसला । पाहतां पाहतां मुळा न संपडे ॥ ३ ॥ निवृत्ति गयनी सांगतुसे खुणा । तो देवकीचा तान्हा बाळ झाला ॥ ४ ॥