भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगा ये विठोबा पाहे मजकडे । कां गा केलें वेडें बाळ माझें

aga ye vithoba pahe majakade | kan ga kelen veden bal majhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अगा ये विठोबा पाहे मजकडे । कां गा केलें वेडें बाळ माझें ॥१॥ तुझें काय खादलें त्वां काय दिधलें । भलें दाखविलें देवपण ॥२॥ आम्हीं म्हणूं तूं ते कृपाळू अससी । आतां तूं कळलासि पंढरिराया ॥३॥ कां देवपण आपुलें भोगूं पैं जाणावें । भक्तां सुख द्यावें हेळामात्र ॥४॥ देव देव होऊनियां अपेश कां घ्यावें । माझें कां बिघडावें एकुलतें बाळ ॥५॥ तूं कैसारे देव या देशावेगळा । बांधितें तुझा गळा परि संतां भ्यालें ॥६॥ तुझी करणी अवघी आम्हां ठाउकीच आहे । बोलोनियां काय हलकट व्हावें ॥७॥ जाणोनि पुंडलिक तुझी न पाहेचि वास । तूं भला नव्हेस घरघेणा ॥८॥ तो बैस पैं न म्हणे तुज याचकाकरणें । जडसी जीवेंप्राणें सात्विकभावें ॥९॥ झणीं तूं आपुला करिसी बोभाट । मग येईल वीट लोकाचारी ॥१०॥ थोरपणें नामा करीं मज आधीन । गोणाई म्हणे चरण धरिन तुझे ॥११॥