भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगा पांडुरंगा भक्तजन कैवारी । सेवकजन द्वारीं तिष्ठताती

aga panduranga bhaktajan kaivari | sevakajan dvarin tishthatati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अगा पांडुरंगा भक्तजन कैवारी । सेवकजन द्वारीं तिष्ठताती ॥१॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान हा पाही । आली मुक्ताबाई चांगदेव ॥२॥ खेचर विसोबा असंद सुदामा॥ चोखा पुरुषोत्तमा आला असे ॥३॥ मैराळ जनक वत्सरा तो नारा । विठा सारंगधरा आला असे ॥४॥ परसा भागवता सांवता नरहरी । चोख मेळा द्वारीं भानुदास ॥५॥ नटनाटयकुसरी कान्होपात्रा द्वारीं । चवरें विंजणें हरी जाणविती ॥६॥ माचंगा अनंता नरसीपुरीं होता । तो हा पंढरीनाथा आला असे ॥७॥ मच्छिंद्र गोरक्ष चरपटी चौरंगीं । गोपीचंद योगी आला असे ॥८॥ इडा ती पिंगळा सूक्ष्म ती आवळा । षड्रस गोपाळा घेऊनि आला ॥९॥ तेथें टाळ दिंडी घेऊनियां नामा । भेटी पुरुषोत्तमा आला असे ॥१०॥