भजनी मालिका
← भजनांकडे परत

अज्ञान बांळंक तुझा प्रल्हाद धांवा करितां । आणि त्रिभुवन देवता नाभीं नाभींरे आतां

adnyan banlank tujha pralhad dhanva karitan | ani tribhuvan devata nabhin nabhinre atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अज्ञान बांळंक तुझा प्रल्हाद धांवा करितां । आणि त्रिभुवन देवता नाभीं नाभींरे आतां । माझा प्रर्‍हादु असे वो केउता । तो कवणें पां गांजिला ॥१॥ वदन पसरूनि विक्राळ । झरझरीत झरे लाळ । नेत्र जैसें वडवानळ । शोषु पाहे जलनिधी ॥२॥ संहार झालें नागकुळ । भ्याले अष्ट लोकपाळ । स्वर्गीं सुटली खळबळ । अमरावती इंद्रासीं ॥३॥ मग दैत्यातें पाचारितु । लोह खणखणा वाजतु । धाकें अंबर गर्जतु । तेणें कांपे मेदिनी ॥४॥ वेटाळूनि चहूं हातीं । विदारिला चपेट घातीं । जैसा रुद्र प्रळ्यांतीं । तैसा हरी दिसतसे ॥५॥ दैत्य न मरे कवणेपरी । मग धरिला जानूवरी । नखें उदर फाडूनि सत्वरीं । अस्थिचुर्ण केलिया ॥६॥ भोजें नाचत देवता । मुक्ति झाली दैत्यनाथा । नामया स्वामि वरदहस्ता । अभय दाता भक्तांसी ॥७॥