भजनी मालिका
← भजनांकडे परत

अज्ञान बालक कोमाईलें झणीं । जाणे ते जननी तानभूक

adnyan balak komailen jhanin | jane te janani tanabhuk

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अज्ञान बालक कोमाईलें झणीं । जाणे ते जननी तानभूक ॥१॥ तैसा मजलागीं होउनि कृपाळ । करी गा संभाळ अनाथाचा ॥२॥ वत्सालागीं धेनु येतसे वोरसे । पान्हा स्तनीं कैसे वोसंडती ॥३॥ नामा म्हणे तुज हें न साहे उपमा । मी कुडी तूं आत्मा केशिराजा ॥४॥