भजनी मालिका
← भजनांकडे परत

अडखळूनि पडसी घालूं नको जोडा । धांवत दुडदुडां

adakhaluni padasi ghalun nako joda | dhanvat dudadudan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अडखळूनि पडसी घालूं नको जोडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥१॥ बैसावयासाठीं घेऊं नको घोडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥२॥ भोजना बैसलासी येथें घेईं विडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥३॥ बाहुबळें काढिला देवांचा जो खोडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥४॥ कृपाळु बहुत लक्ष्मीचा जोडा । त्याला बाहतसे वेडा नामदेव ॥५॥