भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभ्यासिले वेद जाला शास्त्रबोध । साधिल्या विविध नाना कळा

abhyasile ved jala shastrabodh | sadhilya vividh nana kala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अभ्यासिले वेद जाला शास्त्रबोध । साधिल्या विविध नाना कळा ॥१॥ प्रेमाचा जिव्हाळा जंव नाहीं अंतरीं । तंव कैसा श्रीहरि करील कृपा ॥२॥ हित ते आचरा हित ते विचारा । नामीं भाव धरा जाणतेनों ॥३॥ प्रसंगीं पुराणें ऐकिलीं श्रवनीं । त्यांतील कोण मनीं धरील अर्थ ॥४॥ काय तें सांडिलें काय तें मांडिलें । काय तें दंडविलें प्रवृत्तीसी ॥५॥ अनंत ह्रा मूर्ति पाहिल्या लोचनीं । यांतील कोण ध्यानीं प्रतिबिंबली ॥६॥ स्वप्नींचिया परी देखसी अभ्यास । न धरीच विश्वास चित्त तुझें ॥७॥ वांझेचिये स्तनीं अमृताची धणी । मृगजळ पाणी तान्हा बोले ॥८॥ तरी प्रेमेविण कळतो क्रियाकर्मे । हातीं येतीं वर्मे विठोबाचीं ॥९॥ नामा म्हणे तरी विठो येऊनि भेटे । कायाच पालटे कैवल्य होय ॥११॥