भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभंगाची कळा नाहीं मी नेणत । त्वरा केली प्रीत केशिराजें

abhangachi kala nahin mi nenat | tvara keli prit keshirajen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अभंगाची कळा नाहीं मी नेणत । त्वरा केली प्रीत केशिराजें ॥१॥ अक्षरांची संख्या बोलिले उदंड । मेरू सुप्रचंड शर आदि ॥२॥ सहा साडेतीन चरण जाणावेअ । अक्षरें मोजावीं चौकचारी ॥३॥ पहिल्यापासोनि तिसर्‍यापर्यंत । अठरा गणित मोज आलें ॥४॥ चौकचारी आधीं बोलिलों मातृका । बाविसावी संख्या शेवटील ॥५॥ दीड चरणाचें दीर्घ तें अक्षर । मुमुक्षु विचार बोध केला ॥६॥ नामा म्हणे मज स्वप्न दिलें हरी । प्रीतीनें खेचरीं आज्ञा केली ॥७॥