भजनी मालिका
← भजनांकडे परत

येवोनी जवळीं कुर्वाळिलें वदन । चालिले स्फ़ुंदन सदगदित

yevoni javalin kurvalilen vadan | chalile sफ़undan sadagadit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येवोनी जवळीं कुर्वाळिलें वदन । चालिले स्फ़ुंदन सदगदित ॥१॥ सांवता म्हणे नाम्या कां रे रडतोसी । काय जाहले तुजसी सांग मज ॥२॥ नामा म्हणे देव पळोनियां आले । येथें गुप्त जाहले न कळे कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं करितसे खेद । कां हो तो गोविंद दुरी गेला ॥४॥