भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनियां घरा नामदेव पाहे । आजी दिसताहे विपरीत

yeuniyan ghara namadev pahe | aji disatahe viparit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येऊनियां घरा नामदेव पाहे । आजी दिसताहे विपरीत ॥१॥ राजाई तो पुढें येऊनियां बोले । देवें नवल केलें आपुले घरी ॥२॥ जातां चंद्रभागें परीस सांपडला । आपुला तो गेला दैन्यकाळ ॥३॥ एका जनार्दनीं ऐकोनियां मात । क्रोधें पैं संतप्त मनीं नामा ॥४॥