भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनियां घरा बोले राजाईस । या परिसें सुवर्णासी करीं आतां

yeuniyan ghara bole rajais | ya parisen suvarnasi karin atan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येऊनियां घरा बोले राजाईस । या परिसें सुवर्णासी करीं आतां ॥१॥ आजाचिये दिन ठेवीं आपुले घरीं । आपदा ती हरी प्रपंचाची ॥२॥ सरलिया काम देईं मजलागीं । म्हणोनियां वेगें गृहां आली ॥३॥ एका जनार्दनीं झाली ऐसी मात । नामयासी श्रुत केली नाहीं ॥४॥