भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे

yethiliya anubhaven | kalon jiven hen yetase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥१॥ दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥ भूक भुके चि खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥२॥ तुका म्हणे सुख झालें । अंतर धालें त्यागुणें ॥३॥