भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें पुरतें सर्व काज । विश्वास हा जाहला मज । सांपडलें तें निज । बहुकाळांचे ठेवणे

yenen puraten sarva kaj | vishvas ha jahala maj | sampadalen ten nij | bahukalanche thevane

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येणें पुरतें सर्व काज । विश्वास हा जाहला मज । सांपडलें तें निज । बहुकाळांचे ठेवणे ॥१॥ केला पुंडलिकें उपकार । दाविला सोपामार्ग निर्धार जडजीवां उद्धार । नाममत्रें एकाची ॥२॥ तुटलीं बंधने । मागा पाहा अनुभणे एका जानार्दनीं म्हणे । धन्य वास पंढरीसे ॥३॥