भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें पांगें पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन

yenen pangen payampashin | nishchayensi rahen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येणें पांगें पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥१॥ सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥ध्रु.॥ बंधनाची तुटली बेडी । हे चि जोडी मग आम्हां ॥२॥ तुका म्हणे नव्हें क्षण । पायांविण वेगळा ॥३॥