भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें मार्गे आले । त्यांचें निसंतान केलें

yenen marge ale | tyanchen nisantan kelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येणें मार्गे आले । त्यांचें निसंतान केलें ॥१॥ ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ध्रु.॥ नागविल्या थाटी । उरों नेदी च लंगोटी ॥२॥ तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ॥३॥