भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी

yenen janen tari | rahe dev krupa kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥१॥ ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥ भय निवारिता कोण । वेगळा अनंता ॥२॥ तुका म्हणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥३॥ ` २८५१ येणें झाला तुमचे पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥१॥ भरूनियां घरीं राहिलों वाखती । आपुली निश्चिंती आपुल्यापें ॥ध्रु.॥ आतां काय उरी उरली ते सांगा । आणिलेति जगाचिये साक्षी ॥२॥ तुका म्हणे कोठें पाहोंजासी आतां । माझी झाली सत्ता तुम्हांवरी ॥३॥