भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें आमुचे पोरा लावियेला चाळा । आपण निराळा वेगळाची

yenen amuche pora laviyela chala | apan nirala vegalachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येणें आमुचे पोरा लावियेला चाळा । आपण निराळा वेगळाची ॥१॥ याचें तो बिढार राउळींच असे । आम्हांसी कोपट नसे बैसावया ॥२॥ एका जनार्दनीं किती यासी बोलूं । नायके विठ्ठलु आमुचें तो ॥३॥