भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईल तुझ्या नामा । लाज म्हणू पुरुषोत्तमा

yeil tujhya nama | laj mhanu purushottama

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येईल तुझ्या नामा । लाज म्हणू पुरुषोत्तमा ॥१॥ धीर राहिलों धरूनि । त्रास उपजला मनीं ॥ध्रु.॥ जगा कथा नांव । निराशेनें नुपजे भाव ॥२॥ तुम्ही साक्षी कीं गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥