भजनी मालिका
← भजनांकडे परत

यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरी हे नाहीं

yathavidhi puja kari | samogri tonvari he nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरी हे नाहीं ॥१॥ आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥ मंगळ तें तुम्ही जाणां । नारायणा काय तें ॥२॥ तुका म्हणे समर्पीला । तुज विठ्ठला देहभाव ॥३॥