भजनी मालिका
← भजनांकडे परत

यम सांगे दूतां तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा

yam sange dutan tumhan nahin tethen satta | jethen hoy katha sada ghosh namacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यम सांगे दूतां तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥ नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥ चक्र गदा घेउनी हरी उभा असे त्यांचे द्वारीं । लक्ष्मी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥ ते बळयाशिरोमणी हरीभक्ती ये मेदिनी । तुका म्हणे कानीं यम सांगे दूतांचे ॥३॥