भजनी मालिका
← भजनांकडे परत

या रे करूं गाई । जमा निजलेती काई । बोभाटानें आई । घरा गेल्या मारील

ya re karun gai | jama nijaleti kai | bobhatanen ai | ghara gelya maril

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
या रे करूं गाई । जमा निजलेती काई । बोभाटानें आई । घरा गेल्या मारील ॥१॥ घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणें चि मोहरे । एवढें चि पुरे । केलियानें सावध ॥ध्रु.॥ नेणोनियां खेळा । समय समयाच्या वेळा । दुश्चिताजवळा । मिळालेति दुश्चित ॥२॥ तुका म्हणे शीक । न धरितां लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥३॥