भजनी मालिका
← भजनांकडे परत

या चि नांवें दोष । राहे अंतरीं किल्मिष

ya chi nanven dosh | rahe antarin kilmish

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
या चि नांवें दोष । राहे अंतरीं किल्मिष ॥१॥ मना अंगीं पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥ध्रु.॥ बिजाऐसीं फळें । उत्तम कां अमंगळें ॥२॥ तुका म्हणे चित्त । शुद्ध करावें हे हित ॥३॥