भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया

viththal gitin viththal chittin | viththal vishranti bhog jaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥ विठ्ठल जागृतिस्वप्नी सुषुप्ति । आन दुजें नेणती विठ्ठलेंविण ॥२॥ भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥३॥ तुका म्हणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥४॥