भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी

viththal gitin gava viththal chittin dhyava | viththal ubha pahava vitevari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥ अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥ तोचि शरणागतां हा विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥२॥ विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धी। लागली समाधि विठ्ठलनामें ॥३॥ विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख। गोडावलें मुख तुका म्हणे ॥४॥