भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा

viththal amucha nijancha | sajjan soyara jivacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा॥१॥ मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ध्रु.॥ उभयकुळींसाक्ष। तूं चि माझा मातुळपक्ष ॥२॥ समर्पीली काया । तुका म्हणे पंढरिराया॥३॥