भजनी मालिका
← भजनांकडे परत

विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरी

vinavije aisen kanhin | uralen nahin yavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरी ॥१॥ आतां असो पंढरीनाथा । पायीं माथा तुमचिये ॥ध्रु.॥ मागें सारियेली युक्ती । कांहीं होती जवळी ते ॥२॥ निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥३॥