भजनी मालिका
← भजनांकडे परत

विनवीजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली

vinavije aisen bhagya nahin deva | payanshin keshava salagi keli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विनवीजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥ धीटपणें पत्र लिहिलें आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥ध्रु.॥ जेथें देवा तुझा न कळे चि पार । तेथें मी पामर काय वाणूं ॥२॥ जैसे तैसे माझे बोल अंगीकारीं । बोबडा उत्तरीं गौरवितों ॥३॥ तुका म्हणे विटेवरी जी पाउलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥४॥