भजनी मालिका
← भजनांकडे परत

विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा

vichar nahin nar khar to taisa | vahe dnyan pathi bhar lagad taisa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥१॥ वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥ सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥२॥ नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥३॥