भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेरझारीं जाला सीण । बहु केलें खेदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला

verajharin jala sin | bahu kelen khedakshin | bhandanasi din | aji yethen phavala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेरझारीं जाला सीण । बहु केलें खेदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला ॥१॥ आतां काय भीड भार । धरूनियां लोकांचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥ध्रु.॥ आलें बहुतांच्या मना । कां रे न होशी शहाणा । मुळींच्या वचना । आह्मी जागों आपुल्या ॥२॥ तुका म्हणे चौघांमधीं । तुज नेलें होतें आधीं । आतां नामधीं । उरी कांहीं राहिली ॥३॥