भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेळोवेळां सांग जना । मागें दाना सर्वांसी

velovelan sang jana | magen dana sarvansi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेळोवेळां सांग जना । मागें दाना सर्वांसी ॥१॥ मंगल श्रीदत्तराज । स्मरा गुरुराज समर्थ ॥२॥ आयुष्य जाय पळ पळ । करा बळ चिंतना ॥३॥ एका जनार्दनीं लोकां । विसरुं नका सांगतों ॥४॥