भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेधिलें ज्यांचें मन सदा नामस्मरणीं । रामनाम ध्वनीं मुखीं सदा

vedhilen jyanchen man sada namasmaranin | ramanam dhvanin mukhin sada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेधिलें ज्यांचें मन सदा नामस्मरणीं । रामनाम ध्वनीं मुखीं सदा ॥१॥ प्रपंच परमार्थ त्यासी पैं सारखा । अद्वैती तो देखा भेद नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं एकरुप भाव । नाहीं भेदा ठाव तये ठायीं ॥३॥