भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेधल्या गोपिका सकळ । गोवळ आणि गोपाळ । गायी म्हशी सकळ । तया कृष्णाचें ध्यान

vedhalya gopika sakal | goval ani gopal | gayi mhashi sakal | taya krushnachen dhyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेधल्या गोपिका सकळ । गोवळ आणि गोपाळ । गायी म्हशी सकळ । तया कृष्णाचें ध्यान ॥१॥ नाठवें दुजें मनीं कांही । कृष्णावांचुनीं आन नाहीं । पदार्थमात्र सर्वही । कृष्णाते देखती ॥२॥ करितां संसाराचा धंदा । आठविती त्या गोविंदा । वेधें वेधल्या कृष्णाछंदा । रात्रंदिवस समजेना ॥३॥ एका जनार्दनी छंद । ह्रुदयीं तया गोविंद । नाहीं विधि आणि निषेध । कृष्णावांचुनी दुसरा ॥४॥