भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला मोह ममता संग

vedhala jiv majha bhetava shrirang | sarva sandiyela moh mamata sang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला मोह ममता संग । जीवीं जिवला जाला अनंग । भेटता भेटवा मज श्रीरंग ॥१॥ ऐशी विरहिण बोले बोली । कां रे हरी तु सांडी केली ॥धृ ॥ समभाव तुज पहावया । मन आमुचे गुंतलें देवराया । तुं तंव मध्यें घालिसी माया । नको आतां विरह पायां ॥२॥ आमुचा विरह कोण निवारी । विरहिनी बोले ऐशिया परी । एका जनार्दनी श्रीहरी । जन्ममरणाचा विरह निवासी ॥३॥