भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदाभ्यासं श्रमलें । पुराण वक्ते ते भागले

vedabhyasan shramalen | puran vakte te bhagale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदाभ्यासं श्रमलें । पुराण वक्ते ते भागले ॥१॥ तया विश्रांतीस स्थान । अधिष्ठान पंढरी ॥२॥ शास्त्राभ्यास नेहटीं । वादावाद दाटोदाटीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण । पंढरी स्थान ऐशिया ॥४॥