भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदाभ्यास नको सायास ज्योतिष । नामाचा लेश तेथे नाहीं

vedabhyas nako sayas jyotish | namacha lesh tethe nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदाभ्यास नको सायास ज्योतिष । नामाचा लेश तेथे नाहीं ॥१॥ बहुत व्युत्पत्ती सांगती पुराण । व्यर्थ स्मरण नाम नाहीं ॥२॥ अनंत हें नाम जयापासुनि जालें । तें वर्म चुकलें संतसेवा ॥३॥ संतांसी शरण गेलिया वांचुनि । एका जनार्दनीं न कळे नाम ॥४॥