भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाट दावी त्याचें गेलें काय । नागवला जो वारितां जाय

vat davi tyachen gelen kay | nagavala jo varitan jay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाट दावी त्याचें गेलें काय । नागवला जो वारितां जाय ॥१॥ ऐसीं मागें ठकलीं किती । सांगतां खाती विषगोळा॥ध्रु.॥ विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवा नव्हे नास ॥२॥ तुका म्हणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥३॥